** देव हि मनाची दारू आहे ** दारू हि जरी पोटात रिचविलीजात असलीतरी मुळातच दारू (व्यसनं) हि मेंदूत शिरत असते,पोटात भुकेचा आगडोंब उसळला म्हणून लोक दारू पित नसतात तर डोक्यात विचारांचा आगडोंब उसळलेल्या माणसांची पाऊलं नकळतपणे दारुकडे,व्यसनांकडे वळत असतात,मनुष्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यालाच आपण ज्ञान असं म्हणत असतो तर ते ज्ञान हेच मनुष्याच्या मेंदूचं मुख्य खाद्यान्न आहे,मनुष्याच्या मेंदूला जेंव्हा ज्ञान नावाच्या या खाद्यानांची कमतरता भासू लागते अशा वेळी मग मेंदूला दारूचे किंवा व्यसनं करण्याचे एकप्रकारचे डोहाळे लागत असतात,डोहाळे लागलेल्या गरोदर महिला नकळतपणे त्या खडे माती आपल्या तोंडात टाकत असतात,पोटात वाढणारे मुलं आईच्या रक्तातील पोषक तत्व शोषून घेत असल्यामुळे अशा गरोदर मातेच्या शरीराला पोषक तत्वांची कमतरता जाणवू लागते,त्यामुळे त्यांचे हे कुपोषण नकळतपणे अशा डोहळ्यांच्या माध्यमातून ते व्यक्त होत असते,
दारू प्रमाणेच देव हा सुद्धा मनुष्याच्या कुपोषित मनाला लागलेले एकप्रकारचे डोहाळेच आहेत,मानवता हेच मानवी मनाचे मुख्य खाद्यान्न आहे,परंतु आपल्या मानवी जीवन संघर्षात आपली हि मानवता त्या गरोदर माते प्रमाणेच वेळोवेळी कुपोषित होत असते,परिणामी मानवी मनाचे हे कुपोषण देवदेवपणाच्या डोहळ्यांमधून वेळोवेळी ते व्यक्त होत असते,डोहाळे लागले म्हणून त्या गरोदर मातेने पूर्ण नऊ महिने खडे माती खात बसण्याची काहीच गरज नसते,चांगला सकस आहार घेण्या बरोबरच सोबतीला आवश्यक ते व्हिटॅमिन,आयर्न,कॅल्शियम,टॉनिक घेतल्यास त्या कुपोषित गरोदर मातेचे डोहाळे आपोआप दूर होत असतात,तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला जीवनाचा सत्य मार्ग हेच मानवी मनाचे कुपोषण दूर करणारे खरे टॉनिक आहे,परंतु हे कटू सत्याचे टॉनिक सर्वांनाच पचत नसते,म्हणूनच तथागत गौतम बुध्दांच्या अनुयायांनी सुद्धा बुद्धांना भगवान (देव) बुद्ध बनवून टाकलेले असल्याचे दिसून येते,देव तसेच दारूला (व्यसनं) आपण कितीही नाकारण्याचा प्रयत्न करीत असलो तरी बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणेच दुःखी,कष्टी,ताण तणावग्रस्त लोकांना देव तसेच दारूच्या आधाराची गरज भासत असते,असे असले तरी देव तसेच दारूचा उदोउदो करणे हे मानवी विकासाच्या दृष्टीने हानिकारक ठरत असते,म्हणूनच ज्याप्रमाणे दारूला गाव वस्तीपासून तसेच महामार्गांपासून दूर दूर नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याचप्रमाणे देवाला सुद्धा जीवनातून दूर दूर नेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे....
*** संजय भगत.
Comments
Post a Comment