Skip to main content

व्यवसायच का करावा


व्यवसायचं का करावा.
-------------------------------------------------
एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकान ात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.
एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”
या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”
समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”
मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.
हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

Author Unknown

Comments

Popular posts from this blog

दैत्यसुदन मंदिर,लोणार

दैत्यसुदन मंदिर, लोणार दैत्यसुदन मंदिर : राजा विक्रमादित्य यांनी अकराव्या शतकात हे मंदिर बांधले आहे. गावाच्या मध्यभागी विशाल जागेवर आहे. १८७८ साली मातीच्या टेकडीच्या उत्खनन केल्यावर याचा शोध लागला. हे मंदिर वास्तशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची आहे. ती मूळ नाही. नागपूरचे राजे भोसले यांनी पाठवली होती. अशाच प्रकारचे मंदिर कर्नाटकातील हेलेबील बेलूर येथे चन्नाकेशव मंदिरासारखे आहे. इ.स. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे. उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी व...

निळू फुले

निळू फुले: भूमिका घेऊन जगणारा (खल)नायक निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. भेदक डोळे, बेरकी नजर, भारदस्त आवाज आणि खास टोनमध्ये उच्चारलेले ‘बाई वाड्यावर या’ म्हटले की, डोळ्यासमोर येतो गावचा रांगडा पाटील. ज्याच्यात बेरकी, मुरब्बी, मस्तवाल आणि रंगेल स्वभावाचे बेमालून मिश्रण पहायला मिळते. हे मिश्रण उपजतच ज्याच्या व्यक्तीमत्वात होते ते व्यक्तीमत्व म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे सम्राट निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. आज निळू भाऊ आपल्यात नाहीत. माणूस म्हटलं की मृत्यू हा आला. तो कोणालाच चुकला नाही. त्यामुळे निळूभाऊही काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, त्यांचे कालाच्या पडद्याआड जाणे हे केवळ एक निमित्त. बाकी संपूर्ण निळूभाऊ आजही रसिकांच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृती, त्यांचा अभिनय, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यां...