** देव हि मनाची दारू आहे ** दारू हि जरी पोटात रिचविलीजात असलीतरी मुळातच दारू (व्यसनं) हि मेंदूत शिरत असते,पोटात भुकेचा आगडोंब उसळला म्हणून लोक दारू पित नसतात तर डोक्यात विचारांचा आगडोंब उसळलेल्या माणसांची पाऊलं नकळतपणे दारुकडे,व्यसनांकडे वळत असतात,मनुष्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यालाच आपण ज्ञान असं म्हणत असतो तर ते ज्ञान हेच मनुष्याच्या मेंदूचं मुख्य खाद्यान्न आहे,मनुष्याच्या मेंदूला जेंव्हा ज्ञान नावाच्या या खाद्यानांची कमतरता भासू लागते अशा वेळी मग मेंदूला दारूचे किंवा व्यसनं करण्याचे एकप्रकारचे डोहाळे लागत असतात,डोहाळे लागलेल्या गरोदर महिला नकळतपणे त्या खडे माती आपल्या तोंडात टाकत असतात,पोटात वाढणारे मुलं आईच्या रक्तातील पोषक तत्व शोषून घेत असल्यामुळे अशा गरोदर मातेच्या शरीराला पोषक तत्वांची कमतरता जाणवू लागते,त्यामुळे त्यांचे हे कुपोषण नकळतपणे अशा डोहळ्यांच्या माध्यमातून ते व्यक्त होत असते, दारू प्रमाणेच देव हा सुद्धा मनुष्याच्या कुपोषित मनाला लागलेले एकप्रकारचे डोहाळेच आहेत,मानवता हेच मानवी मनाचे मुख्य खाद्यान्न आहे,परंतु आपल्या मानवी जीवन संघर्षात आपली हि मानवता त्या गर...
दैत्यसुदन मंदिर, लोणार दैत्यसुदन मंदिर : राजा विक्रमादित्य यांनी अकराव्या शतकात हे मंदिर बांधले आहे. गावाच्या मध्यभागी विशाल जागेवर आहे. १८७८ साली मातीच्या टेकडीच्या उत्खनन केल्यावर याचा शोध लागला. हे मंदिर वास्तशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची आहे. ती मूळ नाही. नागपूरचे राजे भोसले यांनी पाठवली होती. अशाच प्रकारचे मंदिर कर्नाटकातील हेलेबील बेलूर येथे चन्नाकेशव मंदिरासारखे आहे. इ.स. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे. उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी व...