निळू फुले: भूमिका घेऊन जगणारा (खल)नायक
निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
भेदक डोळे, बेरकी नजर, भारदस्त आवाज आणि खास टोनमध्ये उच्चारलेले ‘बाई वाड्यावर या’ म्हटले की, डोळ्यासमोर येतो गावचा रांगडा पाटील. ज्याच्यात बेरकी, मुरब्बी, मस्तवाल आणि रंगेल स्वभावाचे बेमालून मिश्रण पहायला मिळते. हे मिश्रण उपजतच ज्याच्या व्यक्तीमत्वात होते ते व्यक्तीमत्व म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे सम्राट निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
आज निळू भाऊ आपल्यात नाहीत. माणूस म्हटलं की मृत्यू हा आला. तो कोणालाच चुकला नाही. त्यामुळे निळूभाऊही काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, त्यांचे कालाच्या पडद्याआड जाणे हे केवळ एक निमित्त. बाकी संपूर्ण निळूभाऊ आजही रसिकांच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृती, त्यांचा अभिनय, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचे अतुलनीय योगदान रसिक कधीच विसरणार नाहीत.
मराठी चित्रपटात या गुणी कलाकाराने सुमारे अडीचशेहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. एकेकाळी माळ्याचे काम करणारा हा सर्वसामान्य माणूस पूढे एक अभिनयसम्राट बनला. अष्टपैलू अभिनेते ही त्यांची ओळख होती. त्यांना कोणत्याही भूमिकेचे वावडे नव्हते. नायकाची भूमिका ते जितक्या ताकतीने वटवायचे. त्याही पेक्षा खलनायकाची भूमिकाही ते लिलया वटवायचे. मुळात रंगभूमिवरचा असलेला हा अभिनेता चित्रपटसृष्टीतही तो तितक्यात मनमोकळेपणे वावरला.
अनेक चित्रपटांतील त्यांचे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. दिवसागणीक अगणीत चेहरे कलाकार म्हणून जन्माला घालणाऱ्या आजच्या माध्यमाळलेल्या समाजातही निळूभाऊंना पर्याय नाही. अनेक कार्यक्रमता त्यांच्या अभिनयाची, डायलॉगची आणि विनोदाची कॉपी केली जाते. हे त्यांच्या भारदार अभिनयाचेच यश नाही तर दुसरे काय. अत्यंत कमी लोकांकडे असतो असा दुर्मिळ आवाज त्यांना निसर्गत:च लाभला होता. त्यांनाही त्या आवाजाची जाण होती. म्हणून ते संवादफेकच इतकी अचूक करायचे की, रसिकाच्या काळजाचा ठोका चुकला पाहिजे.
निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ सालातला. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. तर, ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयाच्या या सम्राटाने सलग ४० वर्षे चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द गाजवली. अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील झेलेअण्णांच्या भूमिकेने त्याना चित्रपट व्यवसायात ओळख मिळवून दिली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ दर्शन घडवले आहे.
निळूभाऊंचे नाणे अभिनयात जसे खणखणीत होते. तसेच, ते समाजसेवेतही. अनेक संस्थांन त्यांनी मदत केली आहे. निळूभाऊंचा राष्ट्र सेवा दलाशी खूप जवळचा संबंध होता. एके काळी या निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांची समाजासोबतची नाळ पक्की होते. निळूभाऊंच्या कार्यक्रमाला एकदा मी हजर होतो. तेव्हा त्यांनी उच्चारलेले वाक्य आजही माझ्या मनात घर करून आहे. ते म्हणाले होते, ‘तोंडाला रंग फासून कलाकार म्हणून मी जरी तुमच्या समोर येत असलो तरी, चेहऱ्यावर कोणताही मुखवटा न लावता मला लोकांमध्ये रमायला आवडते. लोकांच्या प्रश्नांसंबंधी काम करायला आवडते. लोक आहेत म्हणून मी आहे आणि लोकांचे प्रेम आहे म्हणून मी कलाकारही आहे’, इतका मोकळेपणा आणि निगर्वीपणा यशस्वी व्यक्तिंमध्ये विरळाच अढळतो.
निळू फुले यांची नाटकातील वाटचालीत त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय. तर, ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ हे त्यांचे विशेष चित्रपट होत. व्यावसायिक गरज म्हणून काही चित्रपट स्वीकारणे भाग पडते. ते त्यानी केले तरी भूमिकाना न्याय दिला.
निळू भाऊंना ग्रामिण आणि शहरी जीवनाचा बाज पक्का माहिती होता. त्यांचे निरिक्षण आणि भूमिकांचा अभ्यासही दांडगा. त्यामुळेया निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहजसुंदरता आणि सर्व काही नैसर्गीक असा त्यांचा अभिनय होता. त्यामुळे सहज सुंदर अभिनय करणा-या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, ‘सूर्यास्त’ या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. भेदक डोळे, बेरकी नजर, भारदस्त आवाज आणि खास टोनमध्ये उच्चारलेले ‘बाई वाड्यावर या’ म्हटले की, डोळ्यासमोर येतो गावचा रांगडा पाटील. ज्याच्यात बेरकी, मुरब्बी, मस्तवाल आणि रंगेल स्वभावाचे बेमालून मिश्रण पहायला मिळते. हे मिश्रण उपजतच ज्याच्या व्यक्तीमत्वात होते ते व्यक्तीमत्व म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचे सम्राट निळू फुले. केवळ नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर उभा राहतो एक जबरदस्त खलनायक. आज या नायकाचा सातवा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
आज निळू भाऊ आपल्यात नाहीत. माणूस म्हटलं की मृत्यू हा आला. तो कोणालाच चुकला नाही. त्यामुळे निळूभाऊही काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, त्यांचे कालाच्या पडद्याआड जाणे हे केवळ एक निमित्त. बाकी संपूर्ण निळूभाऊ आजही रसिकांच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या स्मृती, त्यांचा अभिनय, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचे अतुलनीय योगदान रसिक कधीच विसरणार नाहीत.
मराठी चित्रपटात या गुणी कलाकाराने सुमारे अडीचशेहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. एकेकाळी माळ्याचे काम करणारा हा सर्वसामान्य माणूस पूढे एक अभिनयसम्राट बनला. अष्टपैलू अभिनेते ही त्यांची ओळख होती. त्यांना कोणत्याही भूमिकेचे वावडे नव्हते. नायकाची भूमिका ते जितक्या ताकतीने वटवायचे. त्याही पेक्षा खलनायकाची भूमिकाही ते लिलया वटवायचे. मुळात रंगभूमिवरचा असलेला हा अभिनेता चित्रपटसृष्टीतही तो तितक्यात मनमोकळेपणे वावरला.
अनेक चित्रपटांतील त्यांचे डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. दिवसागणीक अगणीत चेहरे कलाकार म्हणून जन्माला घालणाऱ्या आजच्या माध्यमाळलेल्या समाजातही निळूभाऊंना पर्याय नाही. अनेक कार्यक्रमता त्यांच्या अभिनयाची, डायलॉगची आणि विनोदाची कॉपी केली जाते. हे त्यांच्या भारदार अभिनयाचेच यश नाही तर दुसरे काय. अत्यंत कमी लोकांकडे असतो असा दुर्मिळ आवाज त्यांना निसर्गत:च लाभला होता. त्यांनाही त्या आवाजाची जाण होती. म्हणून ते संवादफेकच इतकी अचूक करायचे की, रसिकाच्या काळजाचा ठोका चुकला पाहिजे.
निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ सालातला. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. तर, ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयाच्या या सम्राटाने सलग ४० वर्षे चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द गाजवली. अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील झेलेअण्णांच्या भूमिकेने त्याना चित्रपट व्यवसायात ओळख मिळवून दिली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ दर्शन घडवले आहे.
निळूभाऊंचे नाणे अभिनयात जसे खणखणीत होते. तसेच, ते समाजसेवेतही. अनेक संस्थांन त्यांनी मदत केली आहे. निळूभाऊंचा राष्ट्र सेवा दलाशी खूप जवळचा संबंध होता. एके काळी या निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांची समाजासोबतची नाळ पक्की होते. निळूभाऊंच्या कार्यक्रमाला एकदा मी हजर होतो. तेव्हा त्यांनी उच्चारलेले वाक्य आजही माझ्या मनात घर करून आहे. ते म्हणाले होते, ‘तोंडाला रंग फासून कलाकार म्हणून मी जरी तुमच्या समोर येत असलो तरी, चेहऱ्यावर कोणताही मुखवटा न लावता मला लोकांमध्ये रमायला आवडते. लोकांच्या प्रश्नांसंबंधी काम करायला आवडते. लोक आहेत म्हणून मी आहे आणि लोकांचे प्रेम आहे म्हणून मी कलाकारही आहे’, इतका मोकळेपणा आणि निगर्वीपणा यशस्वी व्यक्तिंमध्ये विरळाच अढळतो.
निळू फुले यांची नाटकातील वाटचालीत त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय. तर, ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ हे त्यांचे विशेष चित्रपट होत. व्यावसायिक गरज म्हणून काही चित्रपट स्वीकारणे भाग पडते. ते त्यानी केले तरी भूमिकाना न्याय दिला.
निळू भाऊंना ग्रामिण आणि शहरी जीवनाचा बाज पक्का माहिती होता. त्यांचे निरिक्षण आणि भूमिकांचा अभ्यासही दांडगा. त्यामुळेया निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहजसुंदरता आणि सर्व काही नैसर्गीक असा त्यांचा अभिनय होता. त्यामुळे सहज सुंदर अभिनय करणा-या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, ‘सूर्यास्त’ या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.
Comments
Post a Comment