दैत्यसुदन मंदिर, लोणार
दैत्यसुदन मंदिर : राजा विक्रमादित्य यांनी अकराव्या शतकात हे मंदिर बांधले आहे. गावाच्या मध्यभागी विशाल जागेवर आहे. १८७८ साली मातीच्या टेकडीच्या उत्खनन केल्यावर याचा शोध लागला. हे मंदिर वास्तशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची आहे. ती मूळ नाही. नागपूरचे राजे भोसले यांनी पाठवली होती. अशाच प्रकारचे मंदिर कर्नाटकातील हेलेबील बेलूर येथे चन्नाकेशव मंदिरासारखे आहे.
इ.स. १८७८ मध्ये मातीच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करीत असता या मंदिराचे अस्तित्व लक्षात आले. उत्तराभिमुख महाद्वार असणाऱ्या या मंदिराचा आकार अनियमित ताऱ्यासारखा आहे. अनेकविध देवतांची शिल्पे आणि कामशिल्पे असणाऱ्या या मंदिरावर असणारे लवणासुर वध कथा हे विवर निर्मितीशी संबंध दर्शविणारे शिल्पादेखील आहे. याची कथा पद्म पुराणांत सांगितली आहे.
उन्मत्त झालेल्या लवणासूर या दैत्याचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली तेव्हा या दैत्याला मी आघात रूपाने मारेन असे श्री विष्णूनी पृथ्वीला सांगितले. तेव्हा या आघात वेळी आपलाही नाश होऊ नये अशी विनंती पृथ्वीने केली तेव्हा विष्णूने हा आघात बालरूपात येउन केला आणि लवणासुराचा वध केला. त्याच लवणासुराच्या अस्थींमुळे हे विवर खाऱ्या पाण्याचे झाले असे या कथेत सांगितले आहे.

Comments
Post a Comment